E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
महावितरणचे खांब वाकले, ताराही तुटल्या
Samruddhi Dhayagude
22 May 2025
मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी परिसरात दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने सिमेंटचे खांब वाकले, तर काही ठिकाणी वीज वाहक तारा तुटल्याने वीज ग्राहकांना रात्र जागून काढावी लागल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
अवसरी खुर्द गावात महावितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी ही चार गावे आहेत. यासाठी टाव्हरेवाडी गावठाण फिटर योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु गेली पाच दिवसापासून वरील गावामध्ये दोन वेळा मुसळधार पाऊस पडल्याने महावितरण कंपनीचे अनेक ठिकाणी सिमेंट खांब वाकले आहेत. तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या आहेत. अपुर्या कर्मचार्यांमुळे वीजपुरवठा सुरळीत करता येत नाही. त्यातच मुसळधार पावसामुळे चिखल तुडवत वायरमन यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे काम वेळेत होत नाही.
महावितरण कंपनीकडून घराचा वीजपुरवठा बंद करून विद्युत खांबांना अडसर ठरत असलेली झाडे व फांद्या तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. मंगळवारी सायंकाळी चार नंतर झालेल्या वादळी वार्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अवसरी खुर्द जुना बैलगाडा घाटाचे एचपी पेट्रोल पंप जवळील रस्त्यालगत असलेल्या मुख्य विद्युत वाहिनीचे तार पडल्याने अवसरी गावचा विद्युत पुरवठा बंद होता. त्यानंतर रात्री उशिरा अवसरी बुद्रुक पावर हाऊस वरून तात्पुरता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. पावसाळा चालू होण्याअगोदर महावितरण कंपनीचा बोजवारा उडाल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
Related
Articles
रुपल चौधरीला रौप्यपदक
29 May 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025
सोमवारपासून रंगणार ‘ग्लोबल पुलोत्सव’
04 Jun 2025
इराणने लष्करी दर्जाच्या युरेनियमचा साठा वाढवला
02 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार